उपक्रम
तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका विषयावर विस्तृत
माहिती मिळवा व त्याचा इतिहास लिहा. उदा.,
* पेन (लेखणी)चा इत

Question

उपक्रम
तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका विषयावर विस्तृत
माहिती मिळवा व त्याचा इतिहास लिहा. उदा.,
* पेन (लेखणी)चा इतिहास
* मुद्रणकलेचा इतिहास
* संगणकाचा इतिहास​

Imelda 1 year 2021-08-30T02:16:16+00:00 0

Answers ( )

  0
  2021-08-30T02:17:59+00:00

  Answer:

  मुद्रणाचा शोध : मुद्रण करण्यासाठी जे प्राथमिक घटक आवश्यक होते त्यांची जुळणी पश्चिम यूरोपमध्ये हळूहळू होत गेली. त्याच्यासाठी जरूर असणारी आर्थिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी यूरोपमध्ये आधीच तयार झाली होती. काष्ठचित्रांकन (लाकडावर कोरीव काम करून त्यावरून मुद्रण करण्याची कला) ही कला चीनमध्ये अस्तित्वात असेल व ती तेथे महत्त्वाची मानली जात असेल अशी मार्को पोलो (१२५४-१३२४) या इटालियन प्रवाशांना अजिबात कल्पना नव्हती; पण ही कला यूरोपात चौदाव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षांमध्ये माहीत झाली होती. कदाचित कागदाच्या उपयोगामुळे ही कला यूरोपमध्ये आपोआपच लवकर येऊन पोहोचली असावी. खरबरीत अशा चर्मपत्रापेक्षा त्याहून सपाट अशा कागदाच्या पृष्ठावर दाब देऊन अक्षरांचे मुद्रण करणे हे जास्त सोपे आहे असा अनुभव हस्तलिखितांच्या प्रती तयार करणाऱ्यांना आल्यामुळे काष्ठचित्रांकनाची कला प्रगत झाली. याच कलेचा उपयोग धार्मिक चित्रांचे मुद्रण करण्यासाठीही केला गेला. प्रथम फक्त अशा चित्रांचेच मुद्रण होत असे पण नंतर त्याच्याबरोबर काही मजकूरही मुद्रित होऊ लागला. जसजसे लाकडी चित्रे व अक्षरे (ठसे) कोरणाऱ्यांचे कौशल्य वाढले तसे मजकुराला जास्त प्राधान्य मिळत गेले. पंधराव्या शतकाच्या पहिल्या भागास बरीच पाने असलेली पुस्तके अस्तित्वात आली. त्यांत धार्मिक, लॅटिन व्याकरण व इतर संक्षिप्त स्वरूपाचा मजकुर यांचा समावेश होता. त्यांची निर्मिती चिनी मुद्रणयोजनेसारख्या पद्धतीनेच झाली होती. पाश्चात्त्य मुळाक्षरांची संख्या कमी असल्यामुळे लाकडी ठोकळ्यांवर नुसतीच अक्षरे प्रथम कोरून नंतर शब्दांच्या स्वरूपात त्यांची जुळणी करून मुद्रण करणे जास्त सोईचे ठरले. शिवाय ही लाकडी अक्षरे पुनःपुन्हा वापरता येत असत.

  इ. स. १४२३-३७ या काळामध्ये लॉरेन्स यान्सन किंवा कॉस्टर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या डच गृहस्थांनी वर उल्लेखिलेल्या पद्धतीनेच प्रयोग केले असण्याची शक्यता आहे. मोठ्या आकारमानाची अक्षरे कोरून त्यांची जुळणी केल्यानंतर यशस्वी झालेल्या मुद्रणामुळे या कल्पनेची शक्यता प्रत्ययास आली व मुद्रणयोजनेचे महत्त्व सिद्ध झाले. मात्र एखाद्या नेहमीच्या आकारमानाच्या पुस्तकाच्या मजकुरासाठी अक्षराचे जे आकारमान आवश्यक असते त्या बाबतीत मात्र निराशाजनक अनुभव आला. रोमन मुळाक्षरांचे आकारमान चिनी कल्पनाचित्रांपेक्षा बरेच लहान असल्याने लाकडातून लहान अक्षरे कोरून काढणे हे फार नाजूक व कष्टाचे काम आहे, हे कारागिरांच्या लक्षात आले. शिवाय या पद्धतीने तयार केलेली अक्षरे जास्त नाजूक असत व वापरून लवकर झिजत. मोठा लाकडी ठोकळा किंवा लहान लाकडी पट्टी यांपैकी कोणचेही लाकूड झिजण्यामध्ये सारखेच असते, असा अनुभव आहे. शिवाय सर्वच अक्षरे कोरून तयार केलेली असल्याने कोणचीही दोन अक्षरे दिसायला बऱ्याच वेळा सारखी नसत. (उदा.,C या अक्षराचे दोन लाकडी ठोकळे). त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये फारशी सुधारणा झाली नाही आणि उत्पादनामध्ये सुलभता, टिकाऊपणा व दर्जा यांचा अभावच जाणवू लागला.

  Explanation:

  plzz mark this as brainliest

  and plzz follow me

Leave an answer

Browse

12:4+4*3-6:3 = ? ( )